हळदीच्या दुधाचे फायदे (Halad dudh pinyache fayde in marathi)

हळद पाणी किंवा हळदी दुधाचे फायदे जाणून घ्या त्वचेचे आरोग्य, केस गळती, वजन कमी होणे, गळा खवखवणे, मेंदूची कार्यक्षमता सुधारणे आणि अधिक.

टीम साप्ताहिक
Initially published on:
Halad dudh pinyache fayde in marathi
Halad dudh pinyache fayde in marathi | Photo by Shameel mukkath on Pexels.com

जर तुम्हाला त्वचेच्या कोणत्याही विकाराने त्रास होत असेल, तर झोपण्यापूर्वी गरम दूधात एक चमचा हळद टाकून पिणे योग्य ठरेल. हळदीमुळे त्वचेशी संबंधित समस्या कमी होतात आणि त्वचेला निरोगी व तेजस्वी ठेवते. परंतु लक्ष्यात घ्या कि जास्त मिल्क कॉंसुम करणे हे शरीराला हानिकारक आहे.

हळदीच्या दुधाचे फायदे, हळद पाणी किंवा दूधाचे फायदे (Halad dudh pinyache fayde in marathi)

तुम्ही वारंवार प्रवास करणारे असाल आणि पाण्याच्या किंवा हवामान बदलामुळे केस गळतीचा त्रास होत असेल, तर तुमच्या आहारात हळदीचा समावेश करा. हळद केसांच्या मुळांना बळकट करण्यासाठी उपयुक्त ठरते.

वजन कमी करण्यासाठीही हळद प्रभावी मानली जाते. हळदीचे नियोजनबद्ध सेवन आरोग्यदायी वजन राखण्यासाठी मदत करू शकते. तुम्हाला हे माहित नसेल, पण हळदीच्या साहाय्याने दात पांढरे करता येऊ शकतात. दोन चमचे वनस्पती तेलात एक चमचा हळद मिसळा आणि आठवड्यातून दोनदा सकाळी याने दात घासा. एक महिन्यानंतर तुम्हाला दातांच्या पांढरेपणात फरक दिसेल. हाच मिश्रण तुम्ही मुरुमांवर लावल्यास १२-२० दिवसांत आराम मिळतो.

जर तुम्हाला घसा खवखवत असेल किंवा खूप खोकल्याचा त्रास होत असेल, तर झोपण्यापूर्वी एक चमचा हळद घेणे फायदेशीर ठरेल. हळद मेंदूच्या कार्यक्षमतेस चालना देते, म्हणूनच रोजच्या जेवणात हळदीचा भरपूर वापर करा. अभ्यासातून असेही सिद्ध झाले आहे की हळदीचा योग्य प्रमाणात सेवन केल्यास स्ट्रोकचा धोका कमी होतो आणि अग्नाशयाच्या कर्करोगावर उपचार होऊ शकतो.

हळद आजच आपल्या दैनंदिन जीवनात समाविष्ट करा आणि आरोग्यासाठी महत्त्वाचे बदल पहा.

by टीम साप्ताहिक
भारतातील बातम्या, मनोरंजन आणि बरेच काही शोधा! साप्ताहिक हा तुमचा दैनंदिन डोस ज्याची देशभरात चर्चा आहे.

वाचकांना हे पण आवडले