सोमवारी गावावरून पुण्याला येताना शिरूरला थांबलो. पाहुणे सोबत असल्यामुळे त्यांनी चहा घेऊन तुला सोडतो, असं सांगितलं आणि एका ठिकाणी घेऊन आले. Wholemeal Baker’s येथे आल्यानंतर मालक सिद्धार्थ यांच्याशी ओळख करून दिली. आपण शिरूर परिसरातील असाल तर तुम्हाला Cafe College Katta माहित असेल, याच cafe चे मालक सिद्धार्थ यांच्याशी भेट झाली.
त्यांच्याशी बोलताना ते सध्या 2 कॅफे, 1 केक शॉप, 2 बेकरी आणि 2 सँडविच कॅफे चालवत असल्याचं त्यांनी सांगितलं. Tier 2 आणि Tier ३ शहरांमध्ये startup culture वाढत असल्याचे यावेळी लक्षात आले. एवढं सगळं ऐकून घेतल्यानंतर माणसं एकाच वेळी किती गोष्टी करतात आणि आपण मात्र कारणे सांगत बसतो, असंही वाटून गेलं. सिद्धार्थ यांनी attendance साठी thumb system वापरत असून त्याचा वापर कसा केला जातो, याबद्दल माहिती दिली. त्यानंतर मला त्यांच्या भेटीतून काही गोष्टी लक्षात आल्या त्या पुढे देत आहे.
भविष्याचा विचार
1. कॅफेची Social Media Marketing –
कॅफेचे मालक सिद्धार्थ हे सर्व startupची marketing स्वतः करतात. त्यांनी सांगितलं की, reels बनवण्यासाठी course केला आहे. सिद्धार्थ यांनी 21 दिवसांचे चॅलेंज, मतदान trend video, influencer collaboration इ.वेगवेगळे प्रयोग हे सोशल मीडियावर करून पाहिलेत. त्यामध्ये consistency आणि quality ठेवल्यामुळे audience वाढत आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे सोशल मीडियावर महिन्याचा reach 2 ते 3 लाख असून तो कमी झाल्यावर ते paid ads लावतात.
2. भविष्याचा विचार करून व्यवसाय विस्तार –
भविष्याचा विचार करून सिद्धार्थ हे व्यवसाय करत असल्याचे दिसून आले. सुरुवातीला 2013 मध्ये त्यांनी कॅफे कॉलेज कट्टाची सुरुवात केली. त्यानंतर cake shop, bakery, eggs cafe आणि sandwich cafeचा विस्तार केला. त्यांचा भविष्यातील roadmap तयार असून franchisee business मध्ये ते लवकरच enter करणार आहेत.
3. Technology चा वापर –
सिद्धार्थ हे टेक्नॉलॉजीचा वापर करत असल्याचे दिसून आले. आपल्याकडे कामाला असणाऱ्या employee च्या हजेरीसाठी त्यांनी software विकत घेतले असून त्यावर कर्मचारी किती वाजता आले आणि किती वाजता गेले, याबद्दलची माहिती मिळते. त्यानंतर चहाचे कप धुवायला मशीन घेण्यासंदर्भात त्यांनी बोलताना सांगितलं. कामाचा ताण कमी करून business वाढवण्यावर ते लक्ष देत असल्याचे लक्षात आले.
4. Multitasking करणे –
एकटा माणूस एकाच वेळी किती काम करू शकतो याला मर्यादा नसते, हे सिद्धार्थ यांच्याकडे पाहून समजले. सिद्धार्थ बोलत होते, कर्मचाऱ्यांची हजेरी तपासत होते, बेकरीकडे लक्ष देत होते आणि कोणाला काय हवं नको ते पाहत होते. एकाच वेळी अनेक perfect काम करणे हे व्यवसायात किती उपयुक्त असते, हे लक्षात आले.
5. Online Presence कडे लक्ष देणे –
सिद्धार्थ यांचे social media platform सोबतच इतर online प्लॅटफॉर्मकडे लक्ष असल्याचे इंटरनेटवर सर्च केल्यावर लक्षात आले. Justdial आणि Google Map वर त्यांचा Wholemeal Baker’s हा ब्रँड असून दुसऱ्या बाजूला Cafe College Katta हा ब्रँड Zomato वर आहे. त्याला google map वर सरासरी 4 rating मिळाल्याचे दिसून आले.