Marathi Poem: तहानवाटा

वाऱ्यासंगे येशील का रे ???मृदगंधाच्या घेऊनी लाटाइंद्रधनुच्या चिंब कमानीलयकारीच्या रंगछटा !!! धारेसंगे देशील का रे ???मोतियांच्या पूरवाटाअधरावरची कुंद निशाणीनि झोंबणाऱ्या विरहकथा !!! पाऱ्यासमवे जातोस का रे ???खोडसाळुनी पर्ण बटावाट पाहती रिक्त मनानेबांधावरल्या तहानवाटा !!!बांधावरल्या तहानवाटा !!!

Surabhi Mahajan
Initially published on:

वाऱ्यासंगे येशील का रे ???
मृदगंधाच्या घेऊनी लाटा
इंद्रधनुच्या चिंब कमानी
लयकारीच्या रंगछटा !!!

धारेसंगे देशील का रे ???
मोतियांच्या पूरवाटा
अधरावरची कुंद निशाणी
नि झोंबणाऱ्या विरहकथा !!!

पाऱ्यासमवे जातोस का रे ???
खोडसाळुनी पर्ण बटा
वाट पाहती रिक्त मनाने
बांधावरल्या तहानवाटा !!!
बांधावरल्या तहानवाटा !!!

by Surabhi Mahajan

वाचकांना हे पण आवडले